दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🗣️ पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नका, कृषीमंत्री :
राज्यात मोसमी पाऊस हुलकावणी देत असल्याने झालेली पेरणी संकटात सापडली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यांनी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, असे आवाहन केले आहे. दादा भूसे कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
🔝 यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींची बाजी! :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे. म्हणजे परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
😎 राहुल गांधींची चौकशी: राज्यभर काँग्रेसचे आंदोलन :
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नॅशनल हेराल्डप्रकरणी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने केलेल्या चौकशीचा शुक्रवारीही (17 जून) राज्यभर तीव्र निषेध करण्यात आला. औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, नागपूर, अहमदनगरमध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. अनेक ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली.
📣 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा :
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीत एका कार्यक्रमादरम्यान चुकीच्या पार्किंगविरोधात मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, मी असा कायदा आणणार आहे जर कोणी रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहन उभे केले तर त्याला 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर अशा वाहनांचे फोटो काढून पाठवणाऱ्याला 500 रुपये दिले जातील.
💐 हृतिक रोशनच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर :
अभिनेता हृतिक रोशनची आजी पद्मरानी ओमप्रकाश यांचं मुंबईत निधन झालं. पद्मरानी या दिवंगत चित्रपट दिग्दर्शक जे. ओमप्रकाश यांच्या पत्नी आणि हृतिकची आई पिंक रोशन यांच्या आई होत्या. त्या 91 वर्षांच्या होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. अखेर वृद्धापकाळाने त्यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment