सर्व राजकीय गुन्हे मागे घेणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२१ पर्यंतचे राजकीय गुन्हे मागे घेण्यात येणार आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्याची तजबीज या निर्णयातून करण्यात आल्याचे दिसून येत आहेत. आज पार पडलेल्या बैठकीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे केवळ तीनच मंत्री या बैठकीला उपस्थित होते.
विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर शिवसेना नेते एकथाथ शिंदे काही आमदारांसह पहिले सुरत आणि त्यानंतर गुवाहटीत दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होऊन सत्ता पालट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आज राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याचा महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. सरकार बदलल्यास होणारी अडचण टाळण्यासाठी हा निर्णय घेऊन तजवीज करण्यात आल्याचे या निर्णयानंतर समोर आले आहे. सध्याचे सरकार राहिल की जाईल याची कोणतीच शाश्वती नसल्याने अशा प्रकारचा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेचे काही मंत्री हे नाराज एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीला शिवसेनेचे कोणकोणते मंत्री बैठकीला उपस्थित राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन पद्धतीने उपस्थित रहिले होते. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या बैठकीला हजर नव्हते.
No comments:
Post a Comment