दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🗣️ लष्कर भरतीसाठी 'अग्निपथ' योजनेची घोषणा :
केंद्र सरकारने लष्कर भरतीसाठी नवीन घोषणा केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'अग्निपथ' योजनेची घोषणा केली आहे. या भरती अंतर्गत भरती होणाऱ्या सैनिकांना 'अग्नवीर' असं नाव देण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून ही भरती होण्याची शक्यता आहे. 'टूर ऑफ ड्युटी'च्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून त्यामध्ये सैनिकांना केवळ चार वर्षे सैन्यात सेवा करण्याचा पर्याय देण्यात येणार आहे.
💁♂️ 'महागाई'ने ओलांडली धोकादायक पातळी :
इंधन, खाद्य वस्तू आणि भाजीपालाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला आहे. मे महिन्यात महागाई दर 15.88 या विक्रमी पातळीवर गेला. एप्रिल महिन्यात महागाईचा दर 15.08 टक्के इतका होता. मागील 10 वर्षांतील महागाईचा हा उच्चांकी स्तर आहे. केंद्र सरकारने नुकतीच मे 2022 या महिन्याची महागाईची आकडेवारी जाहीर केली आहे.
😳 राज्यातील जनतेला महावितरणाचा मोठा शॉक :
महावितरणने गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ केली आहे. यासाठी इंधन समायोजन शुल्काचा आसरा घेतला आहे. वीज प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत महाग झाली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाने 30 मार्च 2020 ला दिलेल्या आपल्या आदेशात हे शुल्क शून्य केले होते. विशेष म्हणजे महावितरणने नागरिकांना कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
🙏 मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं वारकरी उपस्थित होते. सर्वांनाच या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होती. अखेर या मंदिराचे लोकार्पण झालं आहे. यावेळी वारकऱ्यांनी संत तुकराम महाराजांचा नामघोष केला.
🥳 Jio ची जबरदस्त ऑफर! :
TRAI च्या आदेशानंतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये वॅलिडिटीवाले प्लान जोडले आहेत. जिओच्या पोर्टफोलिओमध्येही एक महिन्यांच्या वॅलिडिटीचे काही प्लान्स उपलब्ध आहेत. जिओच्या 259 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना एका महिन्याची वॅलिडिटी मिळते. तसेच जिओच्या 296 रुपयांच्या प्लानमध्ये तुम्हाला कोणत्याही मर्यादेशिवाय म्हणजेच अनलिमिटेड डेटा दिला जातो.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क -9049195786
No comments:
Post a Comment