दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Friday, June 24, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

  दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



📝 भाजपने राज्यपालांना पत्र पाठवलं :


नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपने पहिला डाव टाकत राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली. कालपर्यंत हा शिवसेनेचा अंतर्गत विषय असल्याचं भाजपच्या वतीने सांगण्यात येत होतं. मात्र, शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पार पडलेल्या भेटीनंतर भाजपने पहिली खेळी केली आहे. 


💁‍♂️ बैठकीनंतर राऊतांचं एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान :


आता वेळ निघून गेली आहे. जर रस्त्यावर लढाऊ झाली तर तिथेही आम्हीच जिंकू अशा शब्दात शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना जाहीर आव्हान दिलं आहे. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुम्ही या, आमची पूर्ण तयारी आहे असं आव्हान दिलं.


🗣️ 'राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही' :


राज्यातील सत्तापरिवतर्नाबाबत काहीही माहिती नसल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. राज्यामध्ये ज्या उलथापालथी होतात, त्याचा भाजपशी  काहीही संबंध नाही. सध्या आम्ही राज्यातील 16 मतदारसंघामध्ये काम करत आहोत. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेचा प्रस्ताव आल्यास कोअर कमिटीमध्ये निर्णय घेतला जाईल. मी जी भूमिका मांडेन ती पक्षाची अधिकृत भूमिका असेल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. 


🚨 गुजरात दंगलप्रकरणी नरेंद्र मोदींना क्लीन चिट


2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी एसआयटीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर अनेकांना क्लीन चिट दिली होती, त्याविरोधात झाकिया जाफरी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज न्यायालयानं आपला निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर निकाल राखून ठेवला होता.


👀 मंकीपॉक्सचा धोका वाढला! 58 देशांमध्ये प्रसार :


जगभरातील 58 देशांमध्ये मंकीपॉक्स विषाणूचं संक्रमण झालं आहे. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता जागतिक आरोग्य समूहानं मंकीपॉक्स विषाणू संसर्गाला महामारी घोषित केलं आहे. जगभरात आतापर्यंत मंकीपॉक्स व्हायरसच्या 3 हजार 417 लोकांना संसर्ग झाला आहे. जागतिक आरोग्य समूहानं एका निवेदनात म्हटलं आहे, अनेक खंडांमध्ये मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव वेगाने पसरत आहे, हे थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर पाऊलं उचलावी लागतील.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment