नूपूर शर्मा म्हणजे भारत नव्हे, कोणीही कोणत्याही धर्माविषयी अद्वातद्वा बोलू नये - ना. छगन भुजबळ
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपूर शर्मा यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद मुस्लिम देशांमध्येही उमटत आहेत. मात्र नूपूर शर्मा म्हणजे संपूर्ण भारत नव्हे, असे स्पष्ट मत अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. आपल्या संविधानात प्रत्येक धर्माचा मान राखावा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही धर्माबाबत कोणीही अद्वातद्वा बोलू नये. तसेच एखाद्या व्यक्तीच्या वक्तव्याची शिक्षा विदेशात राहणाऱ्या वा विदेशात आपले उत्पादन विकणाऱ्या इतर भारतीय नागरिकांना मिळू नये, त्यांना त्रास होऊ नये, अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली.
एखाद्या पक्षातील माथेफिरू लोक केवळ प्रसिद्धीसाठी अशी चुकीची वक्तव्ये करतात. भारत सरकार मुस्लिम देश, मुस्लिम संघटना यांच्याशी चर्चा करून मार्ग काढेल अशी आशा वाटते, असेही भुजबळ म्हणाले
No comments:
Post a Comment