(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
💭 एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट :
बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलं आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी "ही आहे आमदारांची भावना", असं कॅप्शन दिलं आहे. या पत्रातून शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा घणाघाती आरोप केला आहे. एवढंच नाहीतर, सरकारची अडीच वर्ष आमच्यासाठी वर्षाची दारं बंद होती. अनेकदा तासन् तास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली, असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.
😇 भाजपकडून एकनाथ शिंदेंना मोठी ऑफर? :
भाजपाने आता सत्तेचे वातावरण दिसू लागताच शिंदेंना ऑफर दिल्याचे समजते आहे. माहितीनुसार एकनाथ शिंदे यांना उप मुख्यमंत्री पद, 8 कॅबिनेट मंत्री पदे, 5 राज्य मंत्री पदे देण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्रातही सत्तेत वाटा देण्यात येण्याची शक्यता आहे. केंद्रात दोन मंत्री पदे देण्यात येतील.
👀 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे गटाकडून कायदेशीर लढाई! :
शिवसेनेचा 'धनुष्यबाण' मिळवण्यासाठी शिंदे हे कायदेशीर लढाई लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यासोबत सध्या 40 च्या वर आमदारांची संख्या आहे. हे सगळं सुरु असताना 'मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न सुरु करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मूळ पक्ष' म्हणून दर्जा मिळवण्याचेही एकनाथ शिंदेंचे प्रयत्न आहेत, अशी माहिती आहे. यासाठी भाजपची टीम मदत करत आहे.
🚫 नाशिक जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित :
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची अडवणूक करू नये, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले होते. तरी देखील कृषी सेवा केंद्र संचालकांनी विभागाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यातील 31 कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित केल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विवेक सोनवणे व कृषी उपसंचालक कैलास शिरसाठ यांनी दिली.
📍 ट्विटरवर लवकरच येणार नवीन 'Notes' फीचर! :
ट्विटर लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. 'ट्विटर नोट्स' असं या फीचरचं नाव असणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे. या फीचरसह, यूजर्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक लिंक म्हणून मोठा मजकूर (मेसेज) शेअर करू शकतील. Twitter Notes ची पहिली झलक या वर्षी मे महिन्यात दिसली होती, जेव्हा अॅप संशोधक जेन मंचुन वोंग यांनी या फीचरचा स्क्रीनशॉट एका ट्विटवर शेअर केला होता.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क -9049195786
No comments:
Post a Comment