दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Monday, June 20, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



📱 Vivo दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार :


Vivo, सर्वोत्तम कॅमेरा आणि ऑडिओसह Android स्मार्टफोन बनवणारा ब्रँड लवकरच भारतात एक नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी Vivo X80 मालिकेतील दोन नवीन स्मार्टफोन Vivo X80 Lite आणि Vivo X80 Pro Plus लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोनबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, मात्र हा फोन ऑक्टोबरमध्ये बनवला जाईल अशी अपेक्षा आहे. 



🎯 'अग्निपथ'वर केंद्र सरकार ठाम; आजपासून भरती प्रक्रिया सुरू


आजपासून भारतीय लष्करात 'अग्निपथ' योजनेनुसार आजपासून भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करता येणार आहे. एका बाजूला 'अग्निपथ' योजनेला देशभरातून विरोध होत असताना दुसरीकडे आता भरती प्रक्रियेला कसा प्रतिसाद मिळतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. यंदाच्या अग्निवीर भरतीसाठी दोन वर्षांची अट शिथील करण्यात आली आहे. मागील दोन वर्षी सैन्य भरती न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.


🥳 आनंद महिंद्रांकडून 'अग्निवीरां'ना नोकरीची ऑफर :


महिंद्रा समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महिंद्रा यांनी आज सकाळी ट्विट केले की, अग्निपथ योजनेवरून झालेल्या हिंसाचारामुळे मी दु:खी आहे. गेल्या वर्षी जेव्हा या योजनेचा विचार केला गेला तेव्हा मी म्हणालो होतो की, अग्निवीरांनी आत्मसात केलेली शिस्त आणि कौशल्य त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगारक्षम बनवेल. महिंद्रा अग्निवीरांना त्यांच्या कंपनीत संधी देणार आहेत.


😍 मुद्रांक शुल्क दंडात चक्क 90 टक्क्यांपर्यंत मिळणार सवलत :


मुद्रांक शुल्क कमी भरल्याने त्यावर दंड आकारून ती वसूल करण्याची कार्यवाही सुरू असलेल्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय नोंदणी व मुद्रांक विभागाने घेतला आहे. मुद्रांक शुल्काच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत योजना शासनाने लागू केली आहे. त्यानुसार मुद्रांक शुल्क फरकाची रक्‍कम 31 जुलै 2022 पर्यंत भरल्यास दंडावर 90 टक्‍के सवलत मिळणार आहे. जर 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत फरकाची रक्‍कम भरल्यास दंडावर 50 टक्‍के सवलत मिळणार आहे. 



🏏 ...आणि श्रीलंकेची मालिकेत 2-1 नं आघाडी! :


श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. श्रीलंका-ऑस्ट्रेलिया यांच्यात कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर तिसरा एकदिवसीय सामना खेळण्यात आला. या सामन्यात निसांकाआणि  कुशल मेंडिसच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर  श्रीलंकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्स राखून पराभव केला. या मालिकेत श्रीलंकेचा संघ 2-1 नं आघाडीवर आहे. 


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment