अपूर्व आस्मर याचा दत्ता वडगे पुस्तक पेढी तर्फे सत्कार. - latur saptrang

Breaking

Tuesday, June 7, 2022

अपूर्व आस्मर याचा दत्ता वडगे पुस्तक पेढी तर्फे सत्कार.



यूसुफ पठान 

 अपूर्व आस्मर याचा दत्ता वडगे पुस्तक पेढी तर्फे सत्कार.

        संगमेश्वरातील तरुण अपूर्व धनंजय आस्मर नागरी सेवा परीक्षेत (upsc )संपूर्ण भारतातून 558 क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबदल साथी दत्ता वडगे पुस्तकं पेठी, संगमेश्वर, मालेगाव च्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

     पुस्तकं पेठी चे अध्यक्ष राजीव वडगे  यांचे हस्ते पूज्य साने गुरुजी याचा भारतीय संस्कृती हा ग्रंथ व पुष्प गुच्छ देवून अपूर्व आस्मर याचा सत्कार करण्यात आला. प्रा. अनिल महाजन यांनी प्रास्ताविक केले. संगमेश्वर या शेतकरी गावातून उच्य अधिकारी होऊन अपूर्व ने गावाचा बहुमान वाढविला आहे. परिसरातील तरुणांनी त्याचा आदर्श घेवून मार्गक्रमन करावे असे आवाहन प्रा. महाजन यांनी केले.

     अपूर्व आस्मर याने स्पर्धा परीक्षा विषयी यावेळी सखोल मार्गदर्शन केले. जिद्द, मेहनत, सातत्य पुर्ण अभ्यास व पालकाचे प्रोत्साहन यामुळे आपण हे यश मिळवू शकलो. परिसरातील तरुणांनी या प्रकारे मार्गक्रमन केल्यास अधीकारी होऊन देशसेवा करावी असे सत्काराला उत्तर देताना आस्मर यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमास साधना कला मंचचे प्रवीण वाणी, राष्ट्र सेवा दलाचे बळवंत अहिरे, हिंदवी मंडळाचे अशोक सावकार, त्रिशूल मंडळा चे बाला सावकार, सामाजिक कार्यकर्ते हेमंत पुरकर, रमेश पगारे, किशोर चव्हाण, ज्योतीकुमार ब्राह्मणकर, महादेव मंदिराचे विश्वस्त पढरीनाथ आस्मर, नलिनी आस्मर, धनंजय आस्मर, शुभांगी आस्मर, दिलीप मोरे आदी सह कार्यकर्ते उपस्तिथ होते. पुस्तक पेठी चे सचिव मनोज चव्हाण यानी आभार मानले.

No comments:

Post a Comment