शिवसेनेच्या गोटात भूकंप, समर्थकांना लागले दादांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेध - latur saptrang

Breaking

Tuesday, June 21, 2022

शिवसेनेच्या गोटात भूकंप, समर्थकांना लागले दादांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेध

 


Devendra Bhuyar: शिवसेनेच्या गोटात भूकंप, अजित पवारांच्या समर्थकांना लागले दादांच्या मुख्यमंत्रीपदाचे वेध 


मुंबई: विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या गोटात मोठा भूकंप झाला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या स्थैर्यावरच प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे. अशा परिस्थितीत आता महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याची कुजबुज सुरु झाली आहे. अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांच्या एका सूचक वक्तव्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. अजितदादा हे उपमुख्यमंत्री असून ते आत्ताच महाविकास आघाडीचा प्रमुख घटक आहेत. पण उद्या अजितदादा मुख्यमंत्री झाले तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा प्रसंग असेल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र भुयार यांनी दिली आहे.

यावेळी देवेंद्र भुयार यांनी एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनाट्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनाही शाब्दिक चिमटे काढले. संजय राऊत साहेबांनी आता शिवसेना पक्षात अस्तनीतील निखारे कोण आहेत, हे तपासावं. गद्दारांना माफी नाही, असे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे म्हणाले होते. विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेकडे ५५ आमदारांचे संख्याबळ असूनही त्यांना ५२ मतंच मिळाली. त्यामुळे हे तिघेजण कोण, हे राऊतांनी तपासावे. आम्ही अपक्ष आमदार पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीसोबत आहोत आणि राहू, असेही देवेंद्र भुयार यांनी म्हटेल.

उद्धव ठाकरे यांचे गेलं दीड वर्षे आजारपणात गेलं. त्यापूर्वी कोरोनाची साथ होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पुरेसा वेळ देता आला नाही, ही खरी बाब आहे. मात्र,आता राज्याचा गाडा पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे आगामी काळात अशी अडचण येणार नाही, असे देवेंद्र भुयार यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत सूरतच्या हॉटेलमध्ये कोणते आमदार?

एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे इतर दोन मंत्रीही गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. काल संध्याकाळी विधानपरिषदेचे मतदान संपल्यानंतर हे सर्वजण गुजरातच्या दिशेने रवाना झाल्याचे सांगितले जाते. सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेनच्या १३ आमदारांचा मुक्काम सूरतमधील एका हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले जाते. यामध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. तसंच बालाजी किणीकर, संजय शिरसाट, शांताराम मोरे, महेंद्र दळवी आणि नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही आमदार हे शिंदे यांच्यासोबत सुरतमध्ये निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


No comments:

Post a Comment