जाधव कॉमर्स अकॅडमीच्या विदयार्थ्यांचे दैदिप्यमान यश - latur saptrang

Breaking

Thursday, June 16, 2022

जाधव कॉमर्स अकॅडमीच्या विदयार्थ्यांचे दैदिप्यमान यश

jhadav


 जाधव कॉमर्स अकॅडमीच्या विदयार्थ्यांचे दैदिप्यमान यश

 लातूर-  रविवार रोजी जाधव कॉमर्स अकॅडमीच्या अभ्यासिकेत नुकताच यशस्वी विदयार्थ्याचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जाधव कॉमर्स अकॅडमीच्या बारावी बोर्ड परिक्षेत टॉपर आलेल्या तसेच सीए फाउंडेशन परिक्षेत उतीर्ण झालेल्या विदयार्थ्याचे सत्कार व पारितेाषक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.या दैदिप्यमान निकालाच्या गुणवत्तेची परंपरा याही वर्षी विदयार्थ्यांनी कायम राखली असुन या अकॅडमीचा निकाल प्रत्येक वर्षी 100 टकके असतो आणि जास्तीत जास्त सीए घडवण्याचा प्रयत्न अकॅडमीचा असतो भविष्यातही राहण्याचा प्रयत्न अकॅडमीचा असणार आहे. तसेच महामारीच्या काळात विदयार्थ्याचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढू असे प्रतिपादन जाधव कॉमर्स अकॅडमीचे संचालक प्रा.राजाराम जाधव यांनी केले आणि जास्तीत जास्त विदयार्थी यांनी प्रोफेशनल कोर्सेसकडे वळावे व हे प्रोफेशनल कोर्सेसची तयारी कशी करायची याचे ही मार्गदर्शन विदयार्थ्यांना केले.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन प्रा.डॉ.राउत उमाकांत, प्रा.भोंडवे विष्णु तर अध्यक्ष प्रा.राजाराम जाधव हे उपस्थित होते.
जाधव कॉमर्स अकॅडमी जास्तीत जास्त निकाल व उज्जवल यशाची पंरपरा कायम राखील व या पेक्षा अधिक गुणवंत विदयार्थी यश मिळवतील व जास्तीत जास्त सीए घडतील अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वाचे अभिनंदन करून गुणवंताना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
 या सत्कार सोहळयात अकाउंट या विषयात 98 गुण घेवून सर्व प्रथम आलेली कापसे पंकजा पांडुरंग,व्दितीय आलेला 96 गुण घेवुन जाधव चैतन्य बालाजी याने विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हा विदयार्थी लातूर मधील नावाजलेल्या दयानंद वाणिज्य महाविदयालयातून सर्व प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. भोजने श्रध्दा प्रविण हिने अकाउंट या विषयात 94 गुण घेवून सर्व तृतीय तसेच राजनंदा वाणिज्य महाविदयालयातून प्रथम आली आहे.
 या वर्षी अकाउंट या विषयात 70 पेक्षा जास्त गुण मिळवलेले 28 विदयार्थी,80 पेक्षा जास्त गुण मिळवलेले 11 विदयार्थी, तर 90 पेक्षा जास्त गुण मिळवलेेले 3 विदयार्थी आहेत. हे विदयार्थी त्यांच्या कॉलेज मधून टॉप 10 मध्ये आहेत.
तसेच सीए फाउंडेशन परिक्षेत उत्तीर्ण झालेले मस्के ज्योती झुंबर व राठोड दादासाहेब देविदास यांचा पारितोषक व बुके देवुन सत्कार करण्यात आला.
 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.वर्षा भोकरे यांनी केले .या शानदार सत्कार सोहळयास गुणवंत विदयार्थी, पालक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment