कुटूंबनियोजन तसेच असुरक्षित लैगिक संबंधांतून एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनापैकी एक म्हणजे निरोध (कंडोम). अलीकडच्या काळात कंडोमच्या बाबतीत समाजामध्ये बऱ्यापैकी जागरूकता झालेली दिसून येते.आता पुरुषांप्रमाणे महिलाही मेडिकल शॉपमध्ये जाऊन कंडोमची मागणी करतात. लोकांना आकर्षित करण्यासाठी कंडोम बनवणाऱ्या कंपन्यांनी स्ट्रॉबेरी, चॉकलेट असे वेगवेगळे फ्लेव्हरदेखील बाजारात आणलेले आहेत. दरम्यान, कंडोमसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका देशात कंडोमच्या केवळ एका पाकिटासाठी लोकांना तब्बल ६० हजार मोजावे लागतात.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकामधील वेनेजुएला या देशात सोन्यापेक्षाही कंडोम महाग आहे. इथे गर्भनिरोधक गोळ्यांची मागणी इतर गर्भनिरोधक उत्पादनांपेक्षा खूप जास्त आहे. या देशात कंडोमच्या एका पॅकेटची किंमत 60 हजार रुपयांपर्यंत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढी महाग होऊनही लोक ती भरपूर खरेदी करतात. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्यांची किंमत 5-7 हजार रुपये आहे. याशिवाय इतर उत्पादनेही खूप महाग आहेत. काळ्या बाजारात त्यांच्या किमती अधिक होतात.
दक्षिण अमेरिकेतील या देशात कोणत्याही परिस्थितीत गर्भपात हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे येथील लोक कंडोम खरेदी करताना अधिक दिसतात. त्यामुळे त्याच्या किंमतीत वाढ होत आहे.
No comments:
Post a Comment