दिवसभरातील ताज्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
🗣️ एकनाथ शिंदे म्हणाले, लवकरच मुंबईत परतणार, सर्वजण आनंदात :
शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे प्रथमच गुवाहाटीच्या रॅडिसन ब्ल्यू हॉटेलबाहेर आले. यावेळी हॉटेलच्या प्रांगणात उपस्थित असलेल्या पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपला शिवसेनेला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. शिंदे पुढे म्हणाले, 'सेनेचे मुंबईतील नेते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही येथे 50 जण आहोत. सर्वजण स्वतःच्या मर्जीने आलेत. त्यांची भूमिकाही ठाम आहे. ते हिंदुत्व व बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेसाठी येथे आलेत.' आपण लवकरच मुंबईला परतणार असल्याचा दावाही शिंदे यांनी यावेळी केला.
💥 मुंबईतील कुर्ला परिसरात दुर्घटना :
मुंबईतील कुर्ला येथील नाईक नगर परिसरात चार मजली इमारत कोसळली, काल रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकले असण्याची शक्यता आहे, आतापर्यंत 4 ते 5 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
😎 पीएम किसानमध्ये मोठा बदल :
केंद्र सरकारने पीएम किसान योजनेत मोठा बदल केला आहे. आता शेतकरी पोर्टलवर जाऊन आधार क्रमांकावरून त्याची स्थिती तपासू शकत नाही. आता शेतकऱ्यांची स्थिती तपासण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे बंधनकारक झाले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पूर्वी असा नियम होता की शेतकरी आपला आधार किंवा मोबाईल क्रमांक टाकून त्यांची स्थिती तपासू शकतात.
💐 पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन :
शापूरजी पालोनजी ग्रुपचे प्रमुख पालोनजी मिस्त्री यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. सोमवारी रात्री पल्लोनजी यांच निधन झालं. पालोनजी यांच्या पश्चात पत्नी पॅटसी पेरिन दुबास आणि त्यांच्या कुटुंबात 4 मुले आहेत. शापूर मिस्त्री आणि सायरस मिस्त्री या दोन मुलांव्यतिरिक्त त्यांना लैला मिस्त्री आणि अलू मिस्त्री या दोन मुली आहेत.
💁♂️ श्रीलंकेत दोन आठवडे इंधन विक्रीवर बंदी :
सोमवारी मध्यरात्रीपासून आरोग्यासारख्या अत्यावश्यक सेवांना वगळता इतरांना इंधन खरेदी करता येणार नाही. श्रीलंकेकडे सध्या असलेला इंधन साठा हा मर्यादित असून त्याचा योग्य वापर करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही लोकांची माफी मागत असून त्यांच्या गैरसोयीसाठी आम्हाला खेद वाटत असल्याचे सरकारचे प्रवक्ते बंडुले गुणवर्धन यांनी सांगितले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment