दुपारच्या महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Monday, June 27, 2022

दुपारच्या महत्वाच्या घडामोडी




⚡ *जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय* :

जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी  होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा  निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 

💁‍♂️ *बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला* :

राज्यातील सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मात्र, त्याआधीच मोठी बातमी समोर आली आहे. बंडखोर 38 आमदारांनी दाखल केलेल्या याचिकेत सरकारचा पाठिंबा काढला असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीकडून विधानसभा उपाध्यक्षांचा दुरुपयोग सुरू असल्याचा दावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी केला आहे. 

🧐 *शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स* :    

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. उद्या ईडीसमोर चौकशीला हजर राहण्याचे संजय राऊतांना आदेश दिले आहेत. दरम्यान, यासंदर्भातील कोणतीही नोटीस ईडीकडून अद्याप मिळालेली नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. 

🚨 *पोलिसांच्या घरांसाठी ठाकरे सरकारचा ऐतिहासिक निर्णय* :

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात असणाऱ्या पोलिसांच्या घरांच्या किमतीवरुन विरोध झाल्यानंतर अखेर ठाकरे सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता पोलिसांना 50 नाही तर 25 लाखांमध्ये घर मिळणार आहे.  गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

🤰 *आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज* :

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन आलियानं त्याला, 'आमचं बाळ लवकरच येत आहे', असं कॅप्शन दिलं आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत. 

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* - 8888144111

No comments:

Post a Comment