नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी ? - latur saptrang

Breaking

Thursday, June 23, 2022

नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी ?

 



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याआधी सचिवांचे आभार मानणार?

Maharashtra Political Crisis : राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) रिंगणात उतरले आहेत. मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधत शिवसेनेतील बंडखोरांना भावनिक आवाहन केलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्रिपदी नको असेन तर काय करायचं? सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा माझ्यासमोर येऊन सांगायचं, तुम्ही मुख्यमंत्रिपदी नको. मी राजीनामा देण्यास तयार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
दरम्यान, आता या राजकीय घडामोडीत एक मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आज मंत्रालयातील विभागांच्या सचिवांसमवेत बैठक घेणार असून अडीच वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल सचिवांचे आभार मानणार आहेत. ही बैठक ऑनलाईन होणार असून दुपारी १२.३० वाजता मुख्यमंत्री मंत्रालयातील विभागांना संबोधित करणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांची ही बैठक शेवटची तर नाही ना? अशी चर्चा रंगलीय.
शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) विरोधात पक्षाच्या अनेक आमदारांनी बंडाचा बिगुल फुंकलाय. शिंदे आणि इतर बंडखोर आमदार बुधवारी पहाटे सुरतहून आसाममधील गुवाहाटीला रवाना झाले. शिंदेंनी आपल्या बाजूनं 46 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केलाय. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं पालन करावं, असं बंडखोर आमदारांचं म्हणणं आहे.

महाविकास आघाडी सरकार अडचणीत

या बंडामुळं शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आलंय. एवढंच नाही तर या घटनेमुळं शिवसेनेतही तेढ निर्माण झालाय. सरकार अडचणीत असल्याचे पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी आपल्या भाषणात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवलीय. बुधवारी रात्री ते कुटुंबासह 'वर्षा' या सरकारी बंगल्यातून 'मातोश्री' या खासगी निवासस्थानी गेले आहेत. 288 सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे 55 आमदार आहेत.

नव्या सरकारचा रविवारी होणार शपथविधी?

सरकारला व शिवसेनेला शिवसेनेतीलच गटनेते एकनाथ शिंदे यांनी बंडाळी करत सुरुंग लावला. त्यांनी नुसता सुरुंगच लावला नाही तर आपल्यासोबत निम्म्याहून अधिक सेनेचे आमदारही घेऊन गेले. शिंदे यांनी बंडाळी केल्यानंतर काल शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘वर्षा’ हे शासकीय निवासस्थान सोडावं लागलं. आता महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर नवे भाजपचे सरकार येणार असून एकनाथ शिंदे गट व भाजप यांच्या एकत्रितरित्या निर्माण केलेल्या नव्या सरकारचा रविवारी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

No comments:

Post a Comment