राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन - latur saptrang

Breaking

Friday, June 17, 2022

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन

मुंबईदि. 17 : राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. विद्यार्थ्यांनी आपली आवडकल बघून पुढील शैक्षणिक कारकिर्दीची दिशा ठरवावीपरीक्षेतील यशाबरोबरच अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करावाअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या संदेशात म्हणतातयंदा 96.94 टक्के विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा असला तरी अंतिम साध्य नाहीत्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होताखचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शैक्षणिक कारकिर्दीच्या बरोबरीने आपले व्यक्तिमत्व अष्टपैलूसर्वांगसुंदर घडविण्याचा प्रयत्न करावा. शैक्षणिक कारकिर्द ठरवण्यासाठी योग्य शाखा निवडण्याचा दहावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. परंतु विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत कलाक्रीडाछंद आणि कौशल्य आत्मसात करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांची आवडकल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावाअसेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

*****



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/jWG8Kl3
https://ift.tt/JEIex16

No comments:

Post a Comment