HSC Result Date 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर - latur saptrang

Breaking

Tuesday, June 7, 2022

HSC Result Date 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

 

12 result


HSC Result Date 2022: बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल ८ जून रोजी (HSC Result Date) जाहीर केला जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा (12th exam result) ही ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. तत्पूर्वी १४ फेब्रुवारीपासून कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या. राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाच्या तारखेची घोषणा ट्विटर द्वारे केली.

  • पुढील संकेतस्थळांवर बारावीचा ऑनलाइन निकाल पाहता येईल -
1) www.mahresult.nic.in
2) www.hscresult.mkcl.org
3) http://hsc.mahresults.org.in


कोविड -१९ महामारी काळानंतर यावर्षी पहिल्यांदाच बारावीची ऑफलाइन परीक्षा झाली असल्याने या निकालाची अधिक उत्सुकता आहे. मागील वर्षी राज्यातल्या दहावी, बारावीच्या बोर्ड परीक्षा करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांचे त्यांच्या नववी ते अकरावीच्या गुणांच्या आधारे विशिष्ट सूत्रानुसार मूल्यांकन करण्यात आले होते.



यावर्षी विद्यार्थ्यांनी ऑफलाइन पद्धतीने परीक्षा दिल्या. करोना काळात लिखाणाचा सराव सुटल्याने त्यांना परीक्षेकरिता अतिरिक्त वेळ देण्यात आला होता. तसेच काही प्रमाणात अभ्यासक्रमातदेखील कपात करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्ष करोनामुळे ऑनलाइन अभ्यास करावा लागला होता. वर्षाच्या अखेरीस काहीच काळ विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊ लागले होते. त्यामुळे या निकालाची उत्सुकता कायम आहे.

No comments:

Post a Comment