नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व पक्षांनी मोट बांधली असून भाजपेतर राष्ट्रपती होण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलवली होती. दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विरोधी पक्षांकडून आलेली राष्ट्रपतीपदाची ऑफर त्यांनी नाकारली आहे. "मी अजून राजकारणात सक्रीय आहे." असं सांगत ही ऑफर त्यांनी नाकारली आहे.
दरम्यान काँग्रेस पक्षाने अजून कुणाचेही नाव जाहीर केलेले नाही. तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांना राष्ट्रपती निवडणुकांच्या संदर्भात बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. त्यानंतर त्यांनी शरद पवार यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार दिला.
(President Election Updates)
"ते अजूनही सक्रीय राजकारण करू शकतात." असं म्हणत त्यांनी उमेदवारीसाठी नकार दिला आहे. त्यानंतर काँग्रेसकडून कोणत्याही नावाची अधिकृत घोषणा केली नाही. दरम्यान जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकांसाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पाच मोठे नेते गैरहजर होते.
दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना गैरव्यवहार प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपासून ईडी त्यांची चौकशी करत आहे. नॅशनल हेरॉल्ड केसमध्ये ईडीने त्यांच्यावर आरोप केले आहेत. दरम्यान डाव्या पक्षांनीही या बैठकीला हजेरी लावली आहे. पण जगन रेड्डी, आम आदमी पार्टी, अकाली दल, तेलंगणा राष्ट्र समितीचे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे या बैठकीला हजर होते.
दरम्यान जुलैमध्ये राष्ट्रपतींची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी भाजपेतर पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपविरहित राष्ट्रपती उमेदवार देण्यासाठी सर्वांकडून प्रयत्न सुरू आहेत. यावर चर्चा करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती.
No comments:
Post a Comment