Railway Recruitment : आनंदाची बातमी! रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती… - latur saptrang

Breaking

Tuesday, June 21, 2022

Railway Recruitment : आनंदाची बातमी! रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती…

 


Railway Recruitment : आनंदाची बातमी! रेल्वेत 5 हजारहून अधिक पदांवर बंपर भरती…



Railway Recruitment : नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वेनं शिकाऊ पदांवर पदांवर भरतीची अधिसूचना जारी केली असून इच्छुक उमेदवार एनएफआरच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करु शकतात. भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरु झाली आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…

कोणत्या पदांवर भरती? : कटिहार (KIR) आणि टीडीएच (TDH) कार्यशाळेसाठी 919 पदे, अलीपुरद्वारसाठी (KIR) 522 पदे, रंगिया येथे (RNY) 551 पदे, लुमडिंगसाठी 1140 पदे, तिनसुकियासाठी 547 पदे, न्यू बोंगाईगाव, आणि दिब्रुगड कार्यशाळा कार्यशाळेसाठी 1,110 पदे, 847 पदे.

कोण अर्ज करू शकतो? : मान्यता प्राप्त बोर्डातून किमान 50 टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) असणं आवश्यक.

वयोमर्यादा : 15 ते 24 वर्षे दरम्यान

निवड अशी होईल : गुणवत्तेच्या आधारावर निवड केली जाईल.

अर्जाचं शुल्क : 100 रुपये (ऑनलाईन)

अर्ज करण्याची मुदत : 30 जून

अधिकृत वेबसाईट पाहा : https://rrcnfr.in/actaprt22nfr/

No comments:

Post a Comment