दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
👨💼 चार वर्षात मिळणार 1.4 कोटी रोजगार :
सध्या क्लाऊड प्रणाली मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जात असल्याने 2026पर्यंत देशाच्या जीडीपीमध्ये 380 अब्ज डॉलरची भर पडेल, असा विश्वास नॅसकॉम या आयटी कंपन्यांच्या मध्यवर्ती संघटनेने व्यक्त केला आहे. क्लाऊडमुळे याच्याशी संबंधित असे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष 1.40 कोटी रोजगारही निर्माण होतील, असा दावा नॅसकॉमने केला आहे.
😇 आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत घसरण :
देशांतर्गत बाजारात आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत, त्यांच्यात काहीच बदल झालेला नाही. सलग 2 महिन्यांहून अधिक काळ महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती.
🔥 जगावर महागाईचे सावट...! :
अमेरिकेसह जगातील इतर देशांमध्येही महागाईचा स्तर वाढू लागला आहे. ब्रिटनमध्ये जून महिन्यातील महागाई दर 9.4 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. हा महागाई दर मागील 40 वर्षातील सर्वाधिक महागाई दर आहे. बुधवारी ही आकडेवारी जाहीर करण्यात आली. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने (ओएनएस) दिलेल्या माहितीनुसार, जून 2022 ब्रिटनच्या सीपीआय निर्देशांकात 0.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, जून 2021 मध्ये 0.5 टक्क्यांनी वाढ झाली होती.
🧐 सोनिया गांधींच्या चौकशी; राज्यभरात काँग्रेसचा निषेध मोर्चा :
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. याविरोधात देशभरात काँग्रेस आक्रमक झाली असून राज्यातही ठिकठिकाणी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहे. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नेतेदेखील रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
🏅 आशियाई यूथ वेटलिफ्टिंगमध्ये निकिताची रौप्य कामगिरी :
उझबेकिस्तानच्या ताश्कंद शहरात आशियाई यूथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुरू आहे. या स्पर्धेत कोल्हापूरच्या कन्या निकिता कमालकरनं रौप्य पदक पटकावून जगात नाव केलं. तिच्या कौशल्याचं कोल्हापूरच नव्हे तर, देशभरात कौतुक होत आहे. निकिताच्या या यशात कुटुंबाबरोबर प्रशिक्षकांनी खूप मेहनत घेतलीय. विजय माळी यांनी निकिता पाचवीत असल्यापासून तिला वेटलिफ्टिंगचे धडे दिले आहेत.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment