मुंबई, दि. १५ :- राष्ट्रीय स्तरावरील सनदी लेखापाल अर्थात चार्टर्ड अकौंटन्ट (सीए) परीक्षेत देशात पहिला क्रमांक पटकावणाऱ्या मुंबईच्या मीत शहा यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
‘मीत यांचे हे यश करिअरच्या वेगवेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या होतकरू तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपारिक आणि नेहमीच्या अशा क्षेत्रांबरोबरच सनदी लेखापाल हे क्षेत्र व्यापार, उद्योग या क्षेत्रासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामध्ये मीत यांनी घवघवीत यश मिळवणे हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या यशात शहा कुटुंबियांचे पाठबळही महत्वपूर्ण ठरले असेल, त्यासाठी शहा कुटुंबियांचेही अभिनंदन ‘ असे कौतुकही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) घेतलेल्या सनदी लेखापाल (सीए) अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/dCMuDiQ
https://ift.tt/qzfO368
No comments:
Post a Comment