मंत्रीपदाचे अमिष दाखवून भाजप आमदारांकडे १०० कोटींची मागणी, चौघांना अटक
मुंबई : नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रिपद देण्याच्या बदल्यात 100 कोटी रुपयांची मागणी करत दौंड येथील भाजप आमदार राहुल कुल यांच्यासह 3 भाजप आमदारांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
या प्रकरणात अटक केलेले रियाझ शेख (41), योगेश कुलकर्णी (57), सागर संगवई (37) आणि जफर अहमद रशीद अहमद उस्मानी (53) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेण्यात आलेला आरोपी शेख यांने १२ जुलै रोजी भाजप आमदार राहुल कुल यांच्याशी संपर्क साधला होता. मात्र कुल यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यानंत त्यांनी कुल यांच्या पीएशी संपर्क केला होता.
दरम्यान काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला फोन करून सांगितले की, तो मला मंत्रीपद मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. मी लगेच पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांना कळवले. आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी किती लोकांशी संपर्क साधला याची पोलीस चौकशी करत आहेत, असे भाजप आमदार राहुल कुल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment