इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी - latur saptrang

Breaking

Thursday, July 14, 2022

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलैऐवजी ३१ जुलै रोजी

मुंबई, दि. 14 :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) दिनांक 20 जुलै 2022 ऐवजी आता रविवार दिनांक 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूरसदृश स्थिती व काही ठिकाणी भूस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता ही परीक्षा दि. 20 जुलै 2022 ऐवजी रविवार दि. 31 जुलै 2022 रोजी घेण्यात येईल.

यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. 31 जुलै 2022 च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी कळविले आहे.

00000

बी.सी. झंवर/विसंअ/14.7.22

 

 



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/iok6Pal
https://ift.tt/qzfO368

No comments:

Post a Comment