पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार - latur saptrang

Breaking

Monday, July 11, 2022

पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी १७ जुलैपर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येणार

मुंबई, दि. 11 :- पवित्र प्रणालीअंतर्गत शिक्षक पदभरतीसाठी दिनांक 02 सप्टेंबर 2021 रोजी 561 खाजगी व्यवस्थापनाच्या 2062 रिक्त पदासाठी मुलाखतीसह पर्यायांतर्गत 3902 पात्र उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांपैकी ज्या व्यवस्थापनांच्या जाहिरातीमध्ये एसईबीसी प्रवर्गासाठी रिक्त जागा होत्या, तथापि खुल्या प्रवर्गासाठी रिक्त जागा उपलब्ध नव्हत्या अशा सुमारे 196 व्यवस्थापनांतील सुमारे 769 रिक्त पदांसाठी आता एसईबीसी आरक्षणाच्या जागा इडब्ल्युएस / खुल्या प्रवर्गात रूपांतरीत करण्यात आलेल्या आहेत. या सुमारे 769 रिक्त पदांसाठी स्वप्रमाणपत्र अद्ययावत करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी दिनांक 17 जुलै 2022 पर्यंत स्वप्रमाणपत्र अद्ययावत करता येईल. त्यानंतर उमेदवारांकडून उपलब्ध रोस्टर व विषय विचारात घेऊन त्याच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध करुन देण्यात येईल.

या 196 व्यवस्थापनाच्या सुमारे 769 रिक्त पदांसाठी 1:10 या मर्यादेत (उमेदवार उपलब्धतेच्या मर्यादेत) उमेदवार व्यवस्थापनांना उपलब्ध करुन दिले जातील. उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असतील. उमेदवारांची अंतिम निवड या 30 गुणांच्या आधारे व्यवस्थापनांकडून आरक्षण व विषय विचारात घेऊन केली जाईल, असे शिक्षण उपसंचालक (प्रशासन) डॉ.श्रीराम पानझाडे यांनी कळविले आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ/11.7.22



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/MgKD3uH
https://ift.tt/cYOhTgM

No comments:

Post a Comment