माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील पीक कर्ज वाटपासह विविध विकास कामांचा आढावा बँकांनी शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ - latur saptrang

Breaking

Friday, July 8, 2022

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील पीक कर्ज वाटपासह विविध विकास कामांचा आढावा बँकांनी शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ



 माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून येवल्यातील पीक कर्ज वाटपासह विविध विकास कामांचा आढावा

बँकांनी शेतकरी पीक कर्ज वाटपासाठी दिलेले उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करावे - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ




नाशिक,येवला,दि.७ जुलै:- शेतकऱ्यांच्या मागणी नुसार राष्ट्रीयीकृत बँका तसेच जिल्हा बँकांनी लवकरात लवकर शेतकरी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थित आज येवला संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत पीक कर्ज वाटपाचा आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.



यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,तहसीलदार प्रमोद हिले,तालुका उपनिबंधक प्रताप पाडवी, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी, मुख्याधिकारी नागेंद्र मुतगेकर, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, उपअभियंता उन्मेष पाटील, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हर्षल नेहेते, गटविकास अधिकारी अन्सार शेख, इवदचे कुलकर्णी, महावितरणचे श्री.जाधव, श्री. बारसे,कृषी अधिकारी यांच्यासह शेतकरी व बँकेचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.



यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, बँकांना शासनाने दिलेले पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांना पीक कर्जाबाबत असलेल्या अडचणी तातडीने सोडविण्यात याव्यात. शेतकऱ्यांना बियाणे तसेच खतवाटप करतांना अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. विक्रेत्याकडून शेतकऱ्यांना बियाणे खत खरेदी करतांना कुठल्याही इतर वस्तू खरेदी करण्याची सक्ती होणार नाही याकडे लक्ष द्यावे. विक्रेता सक्ती करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा सूचना त्यांनी केल्या.

“सूरतेला जाण्यापेक्षा…”

www.latursaptrangnews.comJul 08, 2022

 Uddhav Thackeray PC: उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ. पण आम्हाला बोलावता














यावेळी तालुक्यातील पावसाचा आढावा घेऊन पाणी टंचाई असलेल्या गावांमध्ये पाणी टँकर सुरू ठेवावे तसेच अतिवृष्टी व पुरपरिस्थिती हाताळण्यासाठी तालुक्यातील यंत्रणेने सज्ज रहावे असे अशा सूचना छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच यावेळी शहर स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, कोरोना यासह विविध सुरू असलेल्या कामांचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी कोरोना  सोबत साथरोगाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यात येऊन रस्त्या अभावी बसेस बंद होणार नाही तसेच शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


No comments:

Post a Comment