मुंबई, दि.30: राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या 14 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.मुंबई (कांजूरमार्ग-1, घाटकोपर-1) -2, पालघर -1,रायगड- महाड- 2, ठाणे-2,रत्नागिरी-चिपळूण-2, कोल्हापूर-2, सातारा-1, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एकूण 12 पथक तैनात आहेत.
नांदेड-1, गडचिरोली-1 असे एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.
राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे 28 जिल्हे व 309 गावे प्रभावित झाली असून 83 तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत. एकूण 14 हजार 480 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे 112 नगरिकांनी आपला जीव गमावला आहे, तर 223 प्राणी दगावले आहेत. 44 घरांचे पूर्णत: तर 2 हजार 86 घरांचे अंशत: नुकसान झालेले आहे.
राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी 11.00 वाजेपर्यंत हा अहवाल प्राप्त झाला आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/GUJClbz
https://ift.tt/IBl2cJU
No comments:
Post a Comment