दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
⚖️ दोन आठड्यात निवडणुका जाहीर करा - सुप्रीम कोर्ट :
आजची सुनावणी फक्त ओबीसी आरक्षणावर असेल असे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले. न्यायमुर्ती खानविलकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यामध्ये वॉर्ड पुनररचनेचा मुद्दा निवडणूक आयोगानं पाहावा, असे कोर्टानं स्पष्ट केलेय. दोन आठड्यात निवडणुका जाहीर करा, असे कोर्टानं स्पष्ट केल्यामुळे महानगर पालिका आणि इतर राज्यातील निवडणुकाचा मार्ग मोकळा झाला आहे. बठिया अहवालानुसार निवडणुका घ्या, असेही कोर्टानं स्पष्ट केले आहे. राज्य सरकारचे वकील शेखर नाफडे यांनी युक्तीवाद केला. सादर केलेल्या अहवालात बऱ्याच त्रुटी असल्याचं याचिकाकर्ते विकास गवळी यांनी सांगितलं.
🧐 राज्यातील सत्ता संघर्षावर 1 ऑगस्टला सुनावणी :
राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेत सुरु असलेला सत्तासंघर्ष मोठ्या खंडपीठ किंवा घटनापीठाकडे सोपवला जाण्याचे संकेत सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वतीने सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या असून त्यावर आज सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी वेळ वाढवून देण्याची मागणी केली होती, ज्यावर उद्धव ठाकरेंच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी आक्षेप घेतला. यानंतर सुप्रीम कोर्टाने अनेक महत्वाचे मुद्दे असून यावर मोठ्या खंडपीठाची गरज भासू शकते, असं सांगत 1 ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असं सांगितलं.
🌧️ राज्यात आतापर्यंत पावसाचे 108 बळी :
राज्यात आत्तापर्यंत झालेला मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीत 108 जणांचा बळी गेला आहे. दरम्यान लाखो किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दर पावसाळ्यात प्रभावित होणाऱ्या कोकणातील परिस्थिती यंदा नियंत्रित असून विदर्भात मात्र पूरस्थिती कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या 700 ते 800 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून एसडीआरएफची एक टीम आणि स्थानिक टीमच्या साहाय्याने वर्धा नदीपात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.
💁♂️ रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती :
श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी निवड रानिल विक्रमसिंघे यांची झाली आहे. विक्रमसिंघे 134 मतांनी विजयी झाले आहेत. रानिल विक्रमसिंघे यांच्या रुपात श्रीलंकेला नवे राष्ट्रपती मिळाले आहेत. श्रीलंकेमध्ये आज राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक पार पडली आहे. राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत प्रबळ दावेदार मानले जाणारे साजिथ प्रेमदासा शर्यतीत बाहेर पडल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी रानिल विक्रमसिंघे विरुद्ध डलास अलाहाप्पेरुमा यांच्यात संघर्ष होता. रानिल विक्रमसिंघे यांच्या विरुद्ध एसएलपीपी खासदार डलास अलाहाप्पेरुमा हे सत्ताधारी पक्षाचे उमेदवार होते. विक्रमसिंघे यांनी डलास अलाहाप्पेरुमा यांचा पराभव केला आहे.
🏏 दक्षिण आफ्रिकेत होणार मिनी आयपीएल :
जगभरातील सर्वात लोकप्रिय लीग आयपीएलपूर्वी दक्षिण आफ्रिकेत मिनी आयपीएल खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचं आयोजन पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात होणार आहे. या लीगमध्ये खेळणाऱ्या 6 संघाना आयपीएल फ्रॅन्चायजींच्या मालकांनीच विकत घेतलंय, अशी माहिती समोर येतेय. प्रसार माध्यमांत झळकत असलेल्या बातमीनुसार, मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद, लखनऊ सुपर जाएंट्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 लीगमध्ये मालकी हक्क मिळवलाय. परंतु, आयोजकांनी अजूनपर्यंत संघ विकत घेणाऱ्यांची अधिकृत घोषणा केलेली नाही.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment