शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “हे शब्द रेशमाचे…” सांस्कृतिक कार्यक्रम   - latur saptrang

Breaking

Thursday, July 21, 2022

शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीनिमित्त “हे शब्द रेशमाचे…” सांस्कृतिक कार्यक्रम  

मुंबईदि. 21 : मराठी साहित्य विश्वातील एक अलौकिक प्रतिभा लाभलेले अमूल्य रत्न म्हणजेकवयित्री शांता शेळके ! त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या हे शब्द रेशमाचे या सांगीतिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन 23 जुलै रोजी रात्री 8.30 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहमुंबई उपनगर येथे करण्यात आले आहे.

ख्यातनाम मराठी लेखिकाकवयित्री शांता शेळके यांच्या दीर्घ लेखन-कारकीर्दीत मराठी साहित्यनिर्मिती व साहित्यविचार यात अनेक स्थित्यंतरे झाली. अनुवादकसमीक्षा-स्तंभ लेखिकावृत्तपत्र सहसंपादक म्हणून शांता शेळके यांनी साहित्यात मोलाची भर घातली आहे. नादलयींचे नेमके भान जपणारी सुलभप्रासादिक रचना हे त्यांच्या काव्य लेखनाचे एक महत्त्वाची वैशिष्ट्य होते. संतांचे अभंगओव्यातसेच पारंपरिक स्त्रीगीतेलोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. शांता शेळके यांच्या विपुल व बहुआयामी साहित्यनिर्मितीचा मागोवा घेत त्यांच्या अलौकिक कार्याची नोंद रहावी याकरिता “हे शब्द रेशमाचे” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची संकल्पना सादरीकरण विनीत गोरे यांनी केले असूनया स्वरसोहळ्यात सुप्रसिद्ध गायक श्रीधर फडकेप्राजक्ता रानडेसावनी रवींद्रजय आजगांवकरअर्चना गोरेनचिकेत देसाईबालकलाकार काव्या खेडेकर व शराण्या साखरदांडे हे गाणी सादर करणार आहेत. प्रशांत लळीत हे संगीत संयोजन करणार असून वैशाली पोतदार यांचे कथक नृत्य सादरीकरण होणार आहे. अभिनेत्री समिरा गुजर-जोशी या निवेदन करणार आहेत. कविता व उतारा अभिवाचन प्रसिद्ध अभिनेते पुष्कर श्रोत्री व प्रसिद्ध अभिनेत्री मधुरा वेलणकर हे करणार आहेत. कवितागाणीकिस्से व वाद्यवृंदांच्या सहाय्याने कार्यक्रमाची प्रस्तुती केली जाईल. सदरील कार्यक्रम हा विनामूल्य असून काही जागा यानिमंत्रितांसाठी राखीव आहेत. सर्व रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा भरुभरुन आस्वाद घेण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/AVJde4z
https://ift.tt/MaQ7KPx

No comments:

Post a Comment