मुंबई, दि. 8 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक संजय धारूरकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शनिवार दि. 9 जुलै व सोमवार 11 जुलै 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. वरिष्ठ सहायक संचालक देवेंद्र पाटील यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला जात आहे, तर काही नद्या आता पात्राबाहेर वाहू लागल्या आहे. काही दरडी कोसळून घाटरस्ते बंद पडण्याच्या घटना घडतात. या काळात राज्याचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतो. आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात संचालक श्री. धारूरकर यांनी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर माहिती दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/kULcTV6
https://ift.tt/M1x5of9
No comments:
Post a Comment