राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात - latur saptrang

Breaking

Tuesday, July 26, 2022

राज्यात पूरस्थिती नियंत्रणासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची १४ पथके तैनात

मुंबई,दि.26 : राज्यात अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफच्या १४ तुकड्या तैनात केल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मुंबईत (कांजूरमार्ग-१घाटकोपर-१) -२पालघर -१रायगड- महाड- २ठाणे-२रत्नागिरी-चिपळूण-२कोल्हापूर-२सातारा-१एनडीआरएफ अशी एकूण १२ पथके तैनात आहेत.

नांदेड-१गडचिरोली-१ अशा एकूण दोन राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात केलेल्या आहेत.

राज्यातील नुकसानीची सद्यस्थिती

राज्यात १ जून पासून आज पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे व ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्र तयार करण्यात आली आहेत व १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नगरिकांनी  आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर २ हजार ०८६ घरांचे अशंत: नुकसान झालेले आहे.

राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाकडून आज  सकाळी 11 वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/8GQXvNg
https://ift.tt/vPAeK3y

No comments:

Post a Comment