पित्याच्या मृत्यूस जबाबदार असणार्या
हलगरा येथील बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई करावी- निष्पाप रुग्णांचे बळी थांबवा
पत्रकार परिषदेत घंटे कुटुंबियांची मागणी
लातूर/प्रतिनिधी
आपल्या पित्याच्या मृत्यूस जबाबदार असणार्या हलगरा ता.निलंगा येथील बोगस डॉक्टर दिपक हेडे यांची चौकशी करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात होणारे रुग्णांचे बळी रोखता येतील, अशी मागणी मयत तुकाराम घंटे यांची पत्नी मंगल घंटे, चिरंजिव संतोष घंटे व मुलगी रेश्मा घंटे यांनी आज ११ जुलै रोजी लातूर येथील पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेवून केली आहे.
हलगरा येथील रहिवासी तुकाराम घंटे यांचे कुटुंब गेल्या काही वर्षांपासून ठाणे-मुंबई येथे नोकरी निमित्त राहत होते. गेल्या महिनाभरापासून तुकाराम घंटे वय ५५ व त्यांचा मुलगा संतोष घंटे हे गावाकडे काही कामानिमित्त आले होते. तुकाराम घंटे यास १ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान उलट्या होत असल्याने त्यांचा मुलगा संतोष याने त्यांना गावातीलच डॉ. दिपक हेडे यांच्या आशादिप क्लिनिकमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी प्रकृती ठिक असल्याचे सांगितले. एक स्लाईन लावली, त्यानंतर दुसरी स्लाईन लावली मात्र तासाभरातच तुकाराम घंटे यांचा मृत्यू झाला. एवढेच नाही तर तात्काळ मृतदेह घेवून जाण्यास सांगितले. त्यानंतर गावातील पोलिस पाटील व इतरांनी डॉक्टरांच्या दबावामुळे वडिलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांचा अंत्यविधी उरकला. असा आरोप संतोषने केला आहे. तसेच डॉ. हेडे हे उपचार करीत असताना दारुच्या नशेत होते, शिवाय सदर डॉक्टर बोगस असून त्यांच्या मुलाच्या डॉक्टरच्या पदवीचा वापर करून हलगरा, बालकुंदा येथे खाजगी दवाखाने चालवितात. यापूर्वी सदर बोगस डॉक्टराच्या चुकीच्या उपचारामुळे अनेकजण दगावले असल्याचा आरोप देखील संतोष घंटे व रेश्मा घंटे यांनी केला आहे. घडल्या प्रकाराबाबत औराद शहाजनी पोलिस ठाणे, पोलिस अधीक्षक, आ. संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी लातूर, जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याकडे तक्रारी अर्ज दिले. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशी खंत घंटे कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केली.
तुकाराम घंटे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बोगस डॉक्टर दिपक हेडे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घंटे कुटुंबियांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे.

No comments:
Post a Comment