📌 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk
😳 जेव्हा-जेव्हा शिवसेना फुटली, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार :
शिवसेनेत आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फुटीमागे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी एनडीएनं आयोजित केलेल्या बैठकीचं शिंदे गटाला निमंत्रण देण्यात आले आहे. त्यासाठी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यावेळी बोलताना त्यांनी हा आरोप केला.
💭 गुरुपौर्णिमेला एकनाथ शिंदेंचे ट्विट :
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करुन बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंना अभिवादन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंच्या आधी ट्विट करत आपण बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा केली नाहीच, हिंदुत्वाशिवाय आपला विचार नाही, असा अप्रत्यक्ष टोलाही शिंदेंनी लगावला आहे.
🗣️ संजय राऊतांची बंडखोर आमदारांवर टीका :
बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचं सांगत आहेत याचं आश्चर्य वाटतं. जर बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं असं सांगत शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांवर टीका केली आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
🌧️ देशात आतापर्यंत 9% पेक्षा जास्त पाऊस :
मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रासह देशातील 25 हून अधिक राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. हवामान विभागानुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कायम आहे. त्यामुळे पुढील चार दिवस छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. . हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, देशात आतापर्यंत सरासरीपेक्षा 9% जास्त पाऊस झाला आहे.
😎 RBI कडून तीन सहकारी बँकांवर कारवाई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन सहकारी बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, बेतियामधील नॅशनल सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि नाशिकमधील 'द नाशिक मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक' यांचा समावेश आहे. या कारवाईचा बँकेच्या ग्राहकांच्या सेवांवर अथवा त्यांच्याद्वारे होणाऱ्या व्यवहारावर कोणताही परिणाम होणार नाही.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment