दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी - latur saptrang

Breaking

Tuesday, July 19, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



👀 शरद पवारांनी शिवसेना फोडली - रामदास कदम :


रामदास कदम म्हणाले, मी लहान माणूस आहे. आपल्याला सल्ला द्यायचा मला अधिकार नाही, पण 50 आमदार का गेले, 12 खासदार का जातायत याचे आपण आत्मपरीक्षण करावे. शरद पवारांनी शिवसेना फोडली. अजित पवारांनी डाव साधला आणि शिवसेनेच्या आमदारांना संपवण्याचा डाव आखला. राष्ट्रवादीच्या आमदारांना शिवसेनेच्या वाट्याचाही निधी मिळाला. त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाने हे पाऊल उचलले, असा हल्लाबोल त्यांनी केला.


🗣️ संजय राऊतांचा भाजपवर आरोप :


शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टची संपत्ती आहे, तर सामना हे प्रबोधन ट्रस्टची जागा आहे. बाळसाहेबांनी ती व्यवस्था केली आहे. उद्या हे लोक मातोश्रीवर येत ही ते हडपण्यासाठी प्रयत्न करू शकतात असे म्हणत उद्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनच केली नाही असे म्हणतील. यांनी सत्तेची भाग पिलेली माणसे आहे... हे लोक उद्या बाळासाहेबांची शिवसेना नाहीच असेही म्हणू शकतात त्यांच्या वैचारिक पातळी खूप उंचावली आहे असा उपहासात्मक टोला ही संजय राऊत यांनी लगावला आहे. 


💁‍♂️ वरुण सरदेसाईंची हकालपट्टी; किरण साळींची नियुक्ती 


युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई देसाई यांची एकनाथ शिंदे यांनी पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या ऐवजी शिंदे गटातील किरण साळी यांची युवासेनच्या राज्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेसेना विरुद्ध शिवसेना यांच्यात कुरघोडीची लढाई सुरू आहे.


😎 स्विमिंग टॅंकमध्ये बुडून मुलाचा मृत्यू : 


लोणावळ्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या नाशिकच्यापवार कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. हॉटेलच्या स्विमिंग टॅंकमध्ये बुडून दोन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेने लोणावळासह पवार कुटुंबीय राहणाऱ्या परिसरात खळबळ उडाली आहे. 


🔥 रुपयाची ऐतिहासिक पडझड; गाठला 80 चा टप्पा :


भारतीय चलन रुपयाचं डॉलरच्या तुलनेत पहिल्यांदाच ऐतिहासिक अवमुल्यन झालंय. मंगळवारी (19 जुलै) 80.5 रुपये प्रति डॉलरपर्यंत ही पडझड झाली. आजपर्यतच्या इतिहासातील हे रुपयाचं सर्वात निचांकी मूल्य आहे. मागील काही दिवसांपासून रुपयाच्या मुल्यात सातत्याने पडझड सुरू आहे. मागील सत्रात रुपया 79.97 रुपये प्रति डॉलर होता.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang  ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment