कोल्हापूर दि. 25 (जिमाका) : माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री.पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी आमदार सर्वश्री सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, चंद्रदीप नरके, भगवानराव साळुंखे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. पाटील यांनी आईच्या आठवणींना उजाळा दिला.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/107kEOq
https://ift.tt/vPAeK3y
No comments:
Post a Comment