दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी ...........उस्मानाबाद जिल्ह्यात ED ची मोठी कारवाई! - latur saptrang

Breaking

Monday, July 11, 2022

दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी ...........उस्मानाबाद जिल्ह्यात ED ची मोठी कारवाई!


 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 bit.ly/registerletstalk 



💁‍♂️ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची महापूजा संपन्न


महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नीसह आज आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरात विठ्ठलाची महापूजा केली. यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पुत्र श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश अशा चार पिढ्या एकत्र होत्या. चारही पिढ्यांच्या हस्ते पूजा करणारे एकनाथ शिंदे राज्याचे पहिले मुख्यमंत्री ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत बीड जिल्ह्यातील गेवराई येथील नवले दाम्पत्याला या शासकीय महापूजेचा मान मिळाला.


🌧️ राज्यात पुरामुळे किमान 130 गावे बाधित 


महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे किमान 130 गावे बाधित झाली असून 200 लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. मात्र, आतापर्यंत कुठूनही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, ही दिलासादायक बाब आहे.


😇 उस्मानाबाद जिल्ह्यात ED ची मोठी कारवाई!


उस्मानाबाद जिल्ह्यात ED ची मोठी कारवाई, 45 कोटींची मालमत्ता जप्त राज्यात गेल्या काही महिन्यात EDच्या वाढलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एका कंपनीवर EDने कारवाई केली आहे. उमरगा MIDC येथील जोगेश्वरी ब्रिव्हरेज या खासगी कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.


😎 छगन भुजबळ यांनी मंजुर केलेल्या कामांना स्थगिती


एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच पहिला दणका छगन भुजबळ यांनी मंजुर केलेल्या कामांना स्थगिती दिली तर आता दुसरा दणका त्यांनी जयंत पाटलांना दिला आहे. जलसंपदा विभागाकडून 3 हजार कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती त्याला तातडीने स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


🎯 माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवा सुविधा


दुसऱ्या महायुद्धातील माजी सैनिक, लघु सेवेतील अधिकारी (एसएससी) आणि वेळेआधीच सेवानिवृत्त होणाऱ्या माजी सैनिकांना आता वैद्यकीय सेवांचा लाभ मिळणार आहे. माजी सैनिक अंशदायी आरोग्यसेवा योजना विभागाच्या (ईसीएचएस) वतीने या माजी सैनिकांना आरोग्य सुविधा पुरविल्या जाणार आहेत.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lets Talk ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment