दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
⚡ एमपीएससीचा मोठा निर्णय! :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षेद्वारे पदभरतीकरता भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचे अनुषंगाने 26 नोव्हेंबर 2021 रोजी निर्णय घेतला होता. आता या पर्यायाच्या कार्यपद्धतीमध्ये काही सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाकडून घेण्यात आला आहे.
💁♂️ शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा :
महाराष्ट्राच्या राजकारणाला आज वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी आज या युतीची घोषणा केली. संयुक्त मेळावे घेण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेडने केले आहे.
😎 अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या :
टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करून 60 दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे.
🌐 ऑक्टोबरमध्ये 5G सेवा देशभर सुरु होणार :
देशात फाईव्ह जी नेटवर्कचे जाळे उभारण्यात येत असून ऑगस्टच्या शेवटी नाही तर सप्टेंबरच्या अखेरीस 5G सेवा सुरु होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. परंतू, देशातील सर्वच भागांत ही सेवा पोहोचण्यासाठी पुढील दोन-तीन वर्षे लागणार असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.
📣 गुलाम नबी आझादांची मोठी घोषणा :
देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने दिल्लीतील राजकारण ढवळून निघाले आहे. आपल्या पुढील वाटचालीबाबत माहिती देताना गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, आता मी जम्मू-काश्मीरमध्ये परतणार आहे. तसेच तिथे मी माझ्या नव्या पक्षाची स्थापना करणार आहे.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 90491 95786
No comments:
Post a Comment