आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - latur saptrang

Breaking

Thursday, August 18, 2022

आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या कामांना प्राधान्य देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 18 : आदिवासी भागातील रस्ते विकासासह पूल दुरूस्तीच्या अनुषंगाने तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासन ठोस पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितले.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील घटनेबाबतचा स्थगन प्रस्ताव विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला होता. त्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी विधानसभेत माहिती दिली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात नवजात जुळ्या बालकांचा उपचाराअभावी मृत्यू होण्याची घटना अत्यंत दुर्देवी आहे. शासनाने ही घटना अतिशय गंभीरपणे घेतली असून आदिवासी भागात चांगल्या दर्जाचे रस्ते असावेत. यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पूल दुरुस्तीची कामे हाती घेणार आहोत. या भागाच्या विकासासाठी शासन ठोस पावले उचलणार आहे आणि या भागात अशा प्रकारे घटना घडू नये त्यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

****

संध्या गरवारे/विसंअ/18.8.22



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/eKFTrYu
https://ift.tt/WpcmkP5

No comments:

Post a Comment