डेंग्युताप प्रतिबंधात्मक उपाययोजना
लातूर/प्रतिनिधी: सध्या पावसाळयाचे दिवस असून डास उत्पत्तीसाठी पोषक वातावरण असल्याने त्यामुळे डेंग्यु/चिकुनगुन्यां आजाराचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्याता नाकारता येत नाही. आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचेमार्फत विविध भागात कंटेनर सर्वेक्षण करण्यात येत आहे. डेंग्यु ताप प्रतिबंधात्म्क व नियंञणात्मक उपाय योजनेअंतर्गत लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने दि.22/08/2022 ते दि. 28/08/2022 या कालावधीमध्ये संपुर्ण शहरात अॅबेट मोहिम व धुरफवारणी मोहिमेचा पहिला राऊन्ड राबविण्यात येणार आहे.शहरातील एकूण अपेक्षीत घरसंख्या 77597 आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (पुरुष /स्त्रीया), आशा स्वतयंसेविका मार्फत घरोघरी जावून सांडपाण्याच्या टाक्यांतील पाणीसाठयात डासअळींची उत्पत्ती झाली आहे का याची तपासणी करुन आरोग्य शिक्षण व आवश्यकतेनूसार अॅबेट टाकण्या्ची कार्यवाही करण्याच येणार आहे.तसेच ज्यांचे घरी डासउत्पत्ती आढळून येईल त्यांना स्वतंत्र सुचनापत्र देण्यात येत आहे.
तरी सर्व नागरीकांनी साठवलेले पाणी उघडे न ठेवता घट्ट झाकणाने सर्व पाणी टाक्या झाकून ठेवाव्यात. झाकण असलेल्याच टाक्यांचा वापर करावा. फुटक्या व झाकता न येवू शकणा-या टाक्या वापरु नयेत व त्या विल्हेसवाटीसाठी घंटागाडीकडे द्याव्यात. टाक्यांना झाकणे नसल्यास झाकणे बसवूण घ्यावीत. निरुपयोगी, भंगार साहित्य छतावर, अंगणात न ठेवता ते घंटागाडी कडे / भंगार विक्रेत्याकडे द्यावे. नळाखाली / परीसरात खड्डे असल्यास बुजवून घ्यावेत. साचलेले पाणीकाढून टाकावे किंवा साचलेल्या पाण्यात खराब ऑईल / तेल टाकावे. फुलदाणीतील पाणी नियमितपणे बदलावे. कुलर व फ्रिजच्या डिफ्रॉट प्लेटमधील पाणी नियमीत बदलावे. शरीर झाकण्यासाठी पूर्ण बाह्याचे कपडे घालावेत. डास चावू नयेत म्हलणून लहान मुला-मुलींना लांब बाह्यांचे शर्ट व पॅन्ट, सलवार व कमीज, लेगीन्स या सारख्या् कपडयांचा वापर करावा. लहान मुलांना कोप-यामध्ये, पलंगाखाली, अंधा-या जागेत बसण्यास व खेळण्यासस प्रतिबंध करावा. खिडक्यां ना जाळया बसवून घ्याव्यात. सेप्टिक टॅंकच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी. झोपतेवेळी मच्छंरदाणीचा वापर करावा. ताप आल्यास त्वरीत दवाखान्यायत तपासणी करुन घ्यावी व वैद्यकीय उपचार घ्यावा. असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने करण्यांत येत आहे.
No comments:
Post a Comment