मोगलाई, कृष्ण नगर, मोचीवाङा, साक्रीरोङ येथील रहिवाश्यांना अतिक्रमण नोटीस शिवसेनेच आयुक्त व महापौर यांना निवेदन नोटीस मागे घेणार-आयुक्तांचे आश्वासन
〰️〰️〰️〰️〰️〰️➖
मोगलाई येथील कृष्ण नगर येथे गेल्या 50 वर्षांपासून अल्प उत्पन्न गटातील सुमारे 50 हुन आधीक रहिवासी राहतात.हे सर्व रहवासी सफाई कामगार, हात मजुरी,करणारे आहात? दारिद्र्य रेषेखालील आहेत, या परिसरातील 2 नागरिकांचे आपापसातील अतिक्रमण वाद असुन या वादाचे निराकारण न करता पालिका अतिक्रमण विभागाने जुन्या 50 घर मालकांना नोटीस देऊन त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस दिली होती, या नोटीसी विरोधात शिवसेने त्या भागातील रहिवाश्यांना सोबत घेऊन धुळे मनपा आयुक्त व महापौर प्रदिप कर्पे यांना जाब विचारत अतिक्रमण विभागाचे प्रसाद जाधव यांच्यावर गंभीर आरोप केले, ऐन पावसाळ्यात रहिवास भागातील अतिक्रमण काढता येत नाही या निर्णयाची आठवण करून देत केवळ एका गटाला हाताशी धरून आर्थिक देवाणघेवाण करून अधिकारी काम करत असल्याचा आरोप या वेळेस उपस्थित सेना पदाधिकारी यांनी केला, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, मा.आ.प्रा. शरद पाटील, महानगर प्रमुख धीरज पाटील,शहर समन्वयक भरत मोरे, सहसमन्वयक संदिप सुर्यवंशी, उपमहानगरप्रमुख महादु गवळी, छोटु माळी, सुरेश चौधरी, आनंद जावङेकर आदींसह शांताबाई चौधरी, मुकेश चौधरी, रमेश परदेशी, राजु चौधरी, मनोहर चौधरी, प्रेमचंद चौधरी, राजाराम मोरे, सिताराम पवार, गुलाबचंद गोयर, निसार शेख, जाहिद शेख, हबीब शेख, अल्ताफ खान, हनिफ कुरेशी, आदींसह नागरीक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment