दळवी महाविद्यालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी - latur saptrang

Breaking

Saturday, August 27, 2022

दळवी महाविद्यालयाचा परिसर शिक्षण क्षेत्रासाठी मार्गदर्शक ठरावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सिंधुदुर्गनगरी, दि. 27 : मुंबई विद्यापीठांतर्गत वैभववाडी तालुक्यातील तळेरे येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाचा (मॉडेल कॉलेज) परिसर शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायक, मार्गदर्शक ठरावा, अशी अपेक्षा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यांच्या हस्ते आज नूतन इमारतीचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते .

याप्रसंगी शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर, प्र.कुलगुरू प्रा.रविंद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, मानद मार्ग निर्देशक विनायक दळवी आदी उपस्थित होते. राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र केवळ आर्थिक राजधानी न राहता हे राज्य शैक्षणिक राजधानी म्हणून संपूर्ण देशात उदयास यावे.

मंत्री दीपक केसरकर म्हणाले, निसर्गाने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधळण केली आहे. भविष्यात राज्यामध्ये सिंधुदुर्ग शैक्षणिक पॅटर्न निर्माण करण्याला आपण प्राधान्य देणार आहोत. आमदार नितेश राणे म्हणाले की, मुंबई विद्यापीठाच्या या कॅम्पसमुळे अल्पदरात विद्यार्थ्यांना चांगले व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल. विदयार्थ्यांचा शैक्षणिक विकास होईल तसेच सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासाकरिता सर्व मतभेद विसरून एकत्रित येऊ. प्रारंभी कुलगुरू श्री.पेडणेकर यांनी प्रास्ताविक करताना या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. या कॅम्पस उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तींचा राज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/izWDpZV
https://ift.tt/6A8naTm

No comments:

Post a Comment