- latur saptrang

Breaking

Monday, August 15, 2022

 दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी


(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका  क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk  




⚡ अँटिलिया प्रकरणानंतर पुन्हा अंबानी कुटुंबाला धमकी


रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आठ वेळेस धमकी दिली असल्याचे समोर आले आहे. अँटिलिया प्रकरणानंतर दुसऱ्यांदा धमकी आल्यामुळे पोलीस सतर्क झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केली आहे. या फोन कॉलमुळे खळबळ उडाली आहे. 


💁‍♂️ आता एसबीआयची सुद्धा कर्जे महागली :


भारतातील सर्वात मोठी कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आज 15 ऑगस्टपासून आपले कर्ज महाग केले आहे. बँकेने निधी आधारित कर्ज दरांमध्ये (MCLR) किरकोळ खर्च वाढवला आहे. यामुळे कर्जदारांच्या ईएमआयवर बोजा वाढेल. कर्ज घेणाऱ्या लोकांना आता व्याजदराच्या रूपात अधिक कर्जाची परतफेड करावी लागणार आहे.


🗣️ मोदींचा घराणेशाहीवर हल्लाबोल, काँग्रेसने म्हटलं :


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात घराणेशाहीवर टीका केल्यानंतर काँग्रेसने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलेच मंत्री आणि त्यांच्या मुलांवर हल्लाबोल केला असून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असे बोलणं चुकीचे असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. 


👀 'राज्याला गतिमान करण्यासाठी सरकार प्रयत्नशील' :


राज्याला गतिमान प्रशासन आणि विकासाला आणखी चालना देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पहिल्या दिवसापासून सामान्यांसाठी सरकार झटत आहे. पावसाने नुकसान झालेल्या ठिकाणी पंचनामे वेगाने सुरू असून मदतीसाठी प्रयत्न केले जात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण झाले. 


🔫 अमरावतीत दिवसाढवळ्या गोळीबार :


देशाच्या स्वांतत्र्यदिनी अमरावतीत एक थरारक घटना घडली. पोलिसांवर गोळीबार करत पळून जाणाऱ्या आरोपींना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग केला. पोलिसांनी आरोपींच्या कारच्या टायरवर निशाणा लावला. त्यामुळे आरोपींचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि पोलिसांनी जीवाची बाजी लावत आरोपींना अटक केली.


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment