मुंबई, दि. 19 : राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील संशोधन संचालक डॉ. शरद रामराव गडाख यांची अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी डॉ. गडाख यांची नियुक्ती जाहीर केली. डॉ. गडाख यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता किंवा ते वयाची ६५ वर्ष पूर्ण करेपर्यंत, यापैकी जे अगोदर येईल, त्या दिवसापर्यंत करण्यात आली आहे.
डॉ. गडाख (जन्म २९ नोव्हेंबर १९६१) यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून वनस्पती शरीर विज्ञान विषयात पीएच. डी. प्राप्त केली असून त्यांना अध्यापन, संशोधन, प्रशासन व विस्तार कार्याचा व्यापक अनुभव आहे.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ दिनांक ४ सप्टेंबर २०२२ रोजी संपल्यानंतर कुलगुरुपद रिक्त झाले होते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्याकडे सदर पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता.
कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी भारतीय कृषि संशोधन परिषदेचे माजी महासंचालक प्रो. एस. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली कुलगुरू निवड समिती गठित केली होती. भारतीय कृषि संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. के. सिंह व कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे सदस्य होते.
समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. गडाख यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
००००
Dr. Sharad Gadakh to be new VC of PDKV
The Governor of Maharashtra and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari today appointed Dr. Sharad Ramrao Gadakh, as the new Vice Chancellor of the Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (PDKV), Akola.
Dr. Sharad Gadakh who is presently serving as the Director of Research, Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri has been appointed for a term of 5 years from the date he assumes the charge of the office of Vice Chancellor or till he attains the age of 65 years, whichever is earlier.
Dr Sharad Gadakh (b. 29 Nov. 1961) has obtained Ph.D. in Plant Physiology from the Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri. He has vast experience of teaching, research, administration and extension work.
The tenure of Dr. Vilas Bhale as Vice Chancellor of the Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth (PDKV), Akola, had ended on 4th September 2022
Dr. Dileep Malkhede, Vice Chancellor of the Sant Gadge Baba Amravati University, Amravati was serving as the Acting Vice Chancellor of the University since then.
The Governor had constituted a selection committee under the chairmanship of Padma Shri Prof. S. Ayyappan, Former Secretary, DARE & DG, ICAR, New Delhi, Chairman, Karnataka Science and Technology Academy, Bengaluru to recommend to him a panel of names suitable for appointment of the Vice Chancellor.
Dr. A. K. Singh, Director, Indian Agricultural Research Institute (IARI), Pusa, New Delhi and Shri Eknath Dawale, Secretary to Government (Agriculture) were members of the Committee.
The Governor announced the name of Dr. Sharad Gadakh after interviewing all candidates recommended by the panel.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/N0iFkKX
https://ift.tt/J9qwk1W
No comments:
Post a Comment