श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली - latur saptrang

Breaking

Wednesday, September 14, 2022

श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांना उपमुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. 13 : सातारचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशी शोकसंवेदना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

सातारा शहराच्या सर्वांगिण विकासासाठी त्यांनी अतिशय भरीव योगदान दिले. नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. अनेक शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले. तळागाळातील नागरिकांशी संवाद, व्यक्तीची अचूक पारख यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी मोठा मित्रपरिवार उभारला होता. अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टचे ते विश्वस्त सुद्धा होते. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ZbnGdCM
https://ift.tt/OvJPTSQ

No comments:

Post a Comment