औरंगाबाद, दि 16 (जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नव्याने उभारण्यात आलेल्या 11 फूट उंचीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज झाले.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, उद्योग मंत्री उदय सामंत, सहकार मंत्री अतुल सावे, सर्वश्री आमदार प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, नारायण कुचे, कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र. कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मुख्यमंत्री शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/zfXJjrZ
https://ift.tt/erQd9nE
No comments:
Post a Comment