भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या परळी शहर उपाध्यक्षपदी सय्यद यासिन जाफर यांची निवड पंकजाताई मुंडेच्या हस्ते नियक्तीपत्र प्रदान - latur saptrang

Breaking

Monday, September 26, 2022

भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या परळी शहर उपाध्यक्षपदी सय्यद यासिन जाफर यांची निवड पंकजाताई मुंडेच्या हस्ते नियक्तीपत्र प्रदान




 भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या परळी शहर उपाध्यक्षपदी सय्यद यासिन जाफर यांची निवड 


पंकजाताई मुंडेच्या हस्ते नियक्तीपत्र प्रदान 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

       भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या परळी शहर उपाध्यक्षपदी सय्यद यासिन जाफर यांची निवड करण्यात आली असून निवडीचे नियुक्तीपत्र भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास  मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले.

         भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चा परळी शहर उपाध्यक्ष पदी सय्यद यासिन जाफर यांची नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकासमंत्री ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे व बीड जिल्ह्याच्या लोकप्रिय खा. डॉ. प्रितमताई गोपीनाथराव मुंडे यांना अभिप्रेत असणारी संघटना बांधण्यासाठी आपण प्रयत्नशील रहाल. पक्ष बळकटी व मजबुत करण्यासाठी पक्षाचे ध्येय धोरणे सामान्या पर्यंत पोहोंचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या निवडी बद्दल आपले अभिनंदन ! असे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. सदरील निवडीचे नियुक्तीपत्र भाजपाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते सय्यद यासिन जाफर यांना प्रदान करण्यात आले. शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळताना आपण पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरवू तसेच राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे व ज्येष्ठांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पक्षाचे विचार आत्मियतेने व तळमळीने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत रुजवण्याचे कार्य आपण करणार असून भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक युवा मोर्चाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांच्या  प्रश्नांना न्याय मिळवून देणार असल्याचे यावेळी बोलताना  नवनिर्वाचित शहर उपाध्यक्ष सय्यद यासिन जाफर यांनी सांगितले. याप्रसंगी परळी शहराचे माजी नगराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चाचे शहराध्यक्ष शेख अनिस यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती



No comments:

Post a Comment