बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, पोलिसांसमोरच धक्काबुक्की - latur saptrang

Breaking

Saturday, September 3, 2022

बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, पोलिसांसमोरच धक्काबुक्की



बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातापरण निर्माण झाले होते. 

    बुलढाणा कुषी उत्पन बाजार समिती (Buldhana Krushi Utpanna Bazar Samiti) येथे शिवसेनेच्या (Shiv Sena) सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमात  शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचा पुत्र आणि कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.  

लाठीचार्ज 
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा इथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक पुढे आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वातावर शांत आहे. 

दरम्यान, आजपर्यंत दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका केली जात होती. परंतु, आता हा संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर आले. 

खुर्च्यांची तोडफोड

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्याने जवळपास 15मिनिटे हा राडा सुरू होता. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमातील काही खुर्च्या देखील तुटल्या आहेत. परंतु, यावेळी पोलिसांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या राड्यामुळे बुलढण्यात तणाव वाढला असून शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. 

No comments:

Post a Comment