परळीतील नवरात्रौत्सवात अश्लील नृत्याचा आरोप, गर्दी आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज
बीड : बीडच्या परळी मध्ये गणेशोत्सवानंतर आता नवरात्र उत्सवात लावणी महोत्सवाच्या नावाखाली अश्लील नृत्य पाहायला मिळाले आहे. नवरात्रौत्सवानिमित्त संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी सार्वजनिक दुर्गा महोत्सवाचे आयोजन केलं आहे. या महोत्सवानिमित्त सिने अभिनेत्री तेजश्री प्रधानला बोलावण्यात आलं. त्यामुळे तेजश्री प्रधानला पाहण्यासाठी परळीकरांनी मोठी गर्दी केली होती.
महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये लावण्यांच्या नावाखाली अश्लील नृत्य सादर करण्यात आल्याचं दिसून आले. दरम्यान, परळीतील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. गणेशोत्सवात देखील धनंजय मुंडे यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून असेच अश्लील नृत्य महाराष्ट्राने पाहिलं आता त्यानंतर मुंडेंच्याच परळीत सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली असं चित्र पाहायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment