मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रकुल स्पर्धेतील बॅडमिंटन खेळात वैयक्तिक सुवर्णपदक तसेच दुहेरी मध्ये रौप्यपदक विजेता चिराग शेट्टी यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून बुधवार दि. १४ आणि गुरुवार दि. १५ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
या मुलाखतीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करण्याच्या अनुभवासोबतच चिराग शेट्टी यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीबद्दल, खेळाडू म्हणून शारीरिक, मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती ‘दिलखुलास’ कार्यक्रमात दिली आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/ORtWgm3
https://ift.tt/OvJPTSQ
No comments:
Post a Comment