अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द - latur saptrang

Breaking

Saturday, September 10, 2022

अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सुमारे ३ हजार ५०१ कोटी जिल्ह्यांना सुपूर्द

मुंबई, दि. १० – जून ते ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतपिकांचे व शेतजमिनीचे नुकसान झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना वाढीव मदत केली जाईल, असे सांगितले होते. त्याप्रमाणे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयही घेण्यात आला होता. राज्यातील ठिकठिकाणच्या  पूरग्रस्तांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी कुणाही नुकसानग्रस्तास वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगितले होते.

त्यानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि राज्य शासनाच्या निधीतून मिळून 3 हजार 501 कोटी निधी जिल्ह्यांना देण्यास मंजुरी देण्यात आली असून मदत व पुनर्वसन विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे.

वाढीव मदतीप्रमाणे जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी 13600 प्रति हेक्टर, बागायत पिकांसाठी 27 हजार रुपये प्रति हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टर अशी तीन हेक्टर मर्यादेपर्यंत मदत देण्यात  येईल.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/W6c09vC
https://ift.tt/Ahqi9ut

No comments:

Post a Comment