मुंबई, दि. 30 :- ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ पद्मभूषण डॉ.अनिल जोशी यांच्या नेतृत्वाखाली गांधी जयंतीच्या दिवशी आर्थिक राजधानी मुंबई ते पर्यावरण राजधानी उत्तराखंड या ८ दिवसांच्या सायकल यात्रेला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजभवन मुंबई येथून हिरवी झंडी दाखवून रवाना करणार आहेत.
आर्थिक विकासासोबत निसर्गाचा समतोल राखला जावा तसेच सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) ऐवजी सकल पर्यावरण उत्पादन (GEP) हा विकासाचा आधार मानला जावा, या हेतूने ही सायकल यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा अंदाजे 2 हजार किमी अंतर पार करताना 7 राज्यांमधून जाणार असून 60 लहान मोठ्या शहरांमधून तसेच एक हजार गावांमधून जाणार असल्याचे आयोजक डॉ अनिल जोशी यांनी सांगितले.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/xGkgruE
https://ift.tt/2yDjRQn
No comments:
Post a Comment