सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय-राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण - latur saptrang

Breaking

Friday, September 23, 2022

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय-राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे स्पष्टीकरण

मुंबई दि.२३: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

२२ सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला असता याबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने याबाबतचा प्रस्ताव हा राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी

जनतेसमोर ठेवला आहे. प्रस्तावावर मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केटमधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे.असा कोणताही निर्णय झालेला नसून निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासांती निर्णय घेईल, असे मंत्री श्री. देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

००००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Btq2mSQ
https://ift.tt/dEv4Dix

No comments:

Post a Comment